Skip to main content

Posts

मकर संक्रमणाच्या शुभेच्छा !

आईने केलेल्या वड्या आणि आमची फोटोग्राफी व चारोळ्या .. कस झालंय ते जरूर सांगा !! :) काही संगणकासाठी wallpapers केले आहेत. ते तुम्हाला इथे मिळतील. या पानावर गेल्यावर डावीकडे download या शब्दावर टिचकी मारा. एक wallpaper.zip अवतरित होईल. त्याच्या आत तीन आकाराचे wall papers आहेत. पुन्हा एकदा .. मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !

पंचममय शाम

"कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का लेलो मजा.. " काल रात्री आर डी च्या चाहत्यांनी म्हणजे पंचम मॅजिक या संस्थेने आयोजित कार्यक्रमाला गेलेलो. टिळक स्मारक मंदिरात नऊ वाजताचा कार्यक्रम होता, पण माझे काम लवकर आटोपल्याने साडेआठलाच पोहोचलो, मला आयोजाकापैकीच एकानी बोलावले होते त्यामुळे पास मिळाला होता, आधीच आत जाऊन बसलो होतो .. आत गेलो तर एक ३०-४० टाळकी गप्पा मारत मारत काम करत होती .. सगळी माझ्यापेक्षा १०-२० वर्षांनी मोठी .. मला वाटल आता बोर होणार कार्यक्रम सुरु होईपर्यंत पण हळूहळू त्याच्या गप्पात मी कधी मिसळलो ते कळलेच नाही. स्टेजवर मोठा पंचमदांचा फोटो, त्याच्याजवळ स्क्रीन, कडेला स्टेन्डवर पंचमचेच तैलचित्र, काळे [ फक्त याच कार्यक्रमासाठी पंचमचे फोटो प्रिंट करून तयार केलेले ] टी-शर्ट घालून कामात गर्क असलेली माणसे, आणि मोठ्यांदा लावलेलं हे गाणं! त्यातही वेगवेगळया विषयावर आणि टाईमपास गप्पा व चहा! जो महोल तयार झाला होता तो खरोखर अवर्णनीय! आर. डी. मय झाला होत सर्व .. हा खरोखर आर. डी. चा करिष्माच आहे कि फक्त एका माणसाच्या प्रेमापोटी, जो त्यांना आयुष्यात कदाचित भेटला असेल वा नसे...

I see you .. मी तुला पाहतेय ...

"I see you" आज मी अवतारच नव्हे, अख्ख विश्वरूप दर्शन पहिल! याच थ्रीडी चित्रपटातील हे वाक्य आहे, आणि चित्रपट संपल्यावर तुम्हाला वाटतच की तुम्ही नुसत पहिलच नाही तर तुम्ही काहीतरी अनुभवलं आहे .. तुमच्या सर्व जाणीवा जाग्या करून सोडणे याला काय म्हणतात? असे विचारलं तर तुम्हाला ते जाणवण्यासाठीच का होईना हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. माणसाच्या दोन्ही चांगल्या व वाईट भावना इथे सशक्त मांडल्या आहेत .. जेम्स कमेरून या माणसाला जर ३D या पेक्षा जर कुठला अजून भारी मेडिया दिला तरी तो त्याचे सोने करेल यात शंकाच नाही.. सशक्त कथा, मांडणी आणि स्पेशल इफेक्ट्स चा यथायोग्य वापर .. श्शी! फारच formal लिहिण होतंय .. हा चित्रपट तुम्ही फक्त पाहायला नव्हे, अनुभवायला हवा आणि तेही थ्रीडीतच! इतकच सांगेन .. वरचे दोन डोळे दाखवणारी जी फ्रेम आहे ती चित्रपटाची शेवटची फ्रेम आहे .. आणि त्या आधी जे घडत ते अविस्मरणीय, जबरदस्त, शब्दात न मांडता येण्यासारखे आहे. don't miss it !

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो .. सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.

टॅगा टॅगी .. - खो !

हेह्हे .. मस्तच आहे ही कल्पना . . . कुणीही मला टॅगल नाहीय . . आणि टाकलं ही नाहीय .. तरीही लिहीलंय .. :)       ये... मला पण कांचन ताईने  आधीच टॅगल होतं पण लिंक चुकीची होती म्हणून कळायला उशीर झाला ..असो .. : हॅप्पी ! : 1.Where is your cell phone? माझ्या कामाच्या टेबलावर 2.Your hair? काळे सरळ .. शहाण्या मुलासारखे !! :P 3.Your mother? शिक्षिका, माझ्या कलाकृतिंची पहिली प्रेक्षक आणि टीकाकार.. 4.Your father? शास्त्रज्ञ .. आणि प्रेरणास्थान .. :) 5.Your favorite food? तर्री मारलेली मिसळ, मग फोडणीची पोळी, पुरणपोळी, मराठी सर्वच्या सर्व पदार्थ.. [मुद्दाम म्हणून कार्ले, मुळा आणि शेपू बंद ..] चायनिज मधील सर्व व्हेज ..इटालियन पास्ता व इतर काही डिशेस.. बाकी आंतरराष्ट्रीय खाणे अजून खाल्लेले नाही.. एकूण मी खाद्यसंस्कृतिरक्षक आहे... :D

Thank you Orkut !!

ओर्कुट ... Profile views: Since Feb '06: 20,586, Last week: 12, Yesterday: 1 २००६ साली मी अरेना मधे शिकत होतो (?) .. प्रश्नचिन्हाकडे टक लावून पाहू नका .. ते ते का आहे ते परत कधी तरी सांगीन.. अनुजा नावाच्या एका बोलघेवड्या मैत्रिणीने मला या ओर्कुट नावाच्या कम्युनिटीवर जवळ जवळ खेचूनच आणलं .. तिच आपलं सारखं चालायच .. ही कम्युनिटी आहे तो ग्रुप आहे.. असं आणि तसं .. शेवटी आलोच .. कोणीच मित्र नव्हते .. काय आहे ते ही कळत नव्हत .. पण तरी ठीक वाटलं .. तेव्हा मी एक्दाच फ़ेसबूक वर जाऊन आलो होतो आणी माय्स्पेस पण वापरल होतं तसंच काही असेल असं वाटलं होतं .. पण हे भलतंच होतं .. परवा सहजंच चाळता चाळता अगदी पहिल्या स्क्रॆप पासून चाळायला सुरुवात केली आणि अनेक टाईमपास .. सिरीयस आठवणी जाग्या झाल्या .. काही स्क्रॅप देत आहे .. हा पहिला वहिला .. Anuja: Hi avadale na! bagh mi sangat hote na join ho mhanun. any ways aata tuzya avadichya ani itar communities bagh. specially Sandeep Khare & Saleel Kulkarni By

आवडता पक्षी - मोर

ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D आवडता पक्षी - मोर मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.

नसतेस घरी तु जेव्हा

संदिप खरे यांच्या “नसतेस घरी तु जेव्हा” या कवितेवर आधारीत IT वर्जन :) नसतेस ऑनलाईन तु जेव्हा जीव तुटका तुटका होतो जी-टॉक चे विरती धागे ऑर्कुट फाटका होतो ॥धृ॥ डिस्क फाटुन क्रॅशच व्हावी कल्लोळ तसा ओढवतो चॅटींग दिशाहीन होते अन लॅन पोरका होतो ॥१॥ येतात ई-मेल दाराशी हिरमुसून जाती मागे विंडोशी थबकुन कर्सर तव मेसेजवाचुन जातो ॥२॥ लघु लिपीत खेळवणाऱ्या त्या स्माईली स्मरती सगळ्या प्रॉक्सी-विन नेट अडावे मी तसाच अगतीक होतो ॥३॥ तु सांग सखे मज काय मी सांगु या स्टेटस लाईन्सना माऊसचा जीव उदास माझ्यासह क्लिक-क्लिक करतो ॥४॥ ना अजुन झालो ऍलोकेट ना बिलेबल अजुनी झालो तुजवाचुन पिंगींग राहते तुजवाचुन मेसेंजर अडतो ॥५॥ ~ ही कविता ई - मेल द्वारे प्रभास गुप्ते यांच्या ब्लॉग वरून मिळालेली आहे . ~

संडे हो या मंडे ..

आज खूपच दिवसानी प्रत्यक्षात युगांनंतर वाटत आहे. पण जलरंगात प्रत्यक्ष जागेवर बसून काम केल. पुणे विद्यापीठातलं जुनं कॅंटीन आहे हे. इथे कायम वर्दळ असते, मुला मुलींचे ग्रूप्स आणि प्रोफेसर लोकांची टोळकी .. [टाळकी] इथे चहा गप्पांसाठी येत असतात .. सतत रिक्षा कार आणि दुचाकी ये जा करत असतात .. आणि रस्ता ओलांडला की एक अत्यंत रम्य आणि निवांत असा बगीचा आहे. फार काहीच तिथे बागकाम केलेले नाहीय. पण तरी ही रम्य आहे ते तिथल्या वृक्षराजी आणि तळ्यामुळे... आणि शांततेमुळॆ आज खूप दिवसानी तिथे गेलो .. जुने कॉलेजचे दिवस आठवले .. स्केचिंग करता करता गप्पा माराय्च्या .. स्पॉट शोधत तास तास शोधत फिरायचं ..स्पॉट सापडला की आजुबाजुचे काही न पहाता लगेच बसून काम सुरु करायचे .. किंवा पाणे आणण्याच्या निमित्ताने इतरांची विशेषत: वर्गातल्या काही खास व्यक्तिंची चित्रे पहायची आणि त्यात ’मदत’ ’corrections' करून द्यायच्या आणि जरा मैत्री वाढवायची .. :P सग्गळ आठवलं पण आज ते आठवून ही काम करायची ओढ कमी झाली नाही की मी भूत काळात रमलोही नाही.. रमावेसे वाटलेही नाही..

तमन्ना है यही .. ऐसे यूं अभी

कॉलेजच्या सुरूवातीच्या दिवसातल आणि आताही माझ्या आवडत्या गाण्या पैकी एक ! आत्ताच ऐकत ऐकत लिहून काढल आहे.. जमल तर नक्की ऐका .. रात्री च्या वेळेस मस्त वाटतं .. :) बादलो की गहराई मे सोचे क्या हुजूर .. उंचे उंचे परबत है जमीं से कितने दूर .. आंहे भरती है ये ठंडी हवा .. ऐसे रंगी राहो मे अब हमको क्या हुआ.. चांद से तारोंका है आपस का फ़ासला बीच मे ये गहना दुनिया .. इस दुनिया को कहते मजबूर मिटा दिया खुद हस्ती को ये है किसका कसूर ? .. तमन्ना है यही .. ऐसे यूं अभी हम बसाये कोई... नया जहा.. आशना हो ये दिल.. प्यार के काबील साज ऐसी भी हो .. सुने जहां मुसाफिर को मिले रासता, जमाने को मिले वासता कैसे कैसे परवानो कि बाते मशहूर जैसे ये नजराने वैसे ही ये सुरूर है यकीन दिल मे सुबह आयेगी जरूर मिटेगा ये अंधेरा होगा हरेक शहने नूर.. .. प्यार करते इधर, प्यार बनते इधर दास्तां ए सिफ़र... सुनो यहां ये भी होंगे खफ़ा .. क्या पता क्या गिला ? हर कदम पे मिले कोई नया.. मुसाफिर को मिले रासता, जमाने को मिले वासता -- अल्बम : सिफ़र गायक : लकी अली..

वंदेमातरम!

खूप दिवसानी लिहाव अस वाटत होतं पण होत नव्हत .. आज भारताचा ६३वा स्वातंत्र्यदिवस .. भारतमातेच्या चरणी स्वत:चे बलिदान देणार्‍या शूराना आठवण्याचा दिवस .. त्यांची अपुरी कार्ये पूर्ण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कार्यक्रम आटोपून आल्यावर मला प्रकर्षाने उणीव जाणवली ती वंदेमातरम च्या पूर्णत्वाची .. का आपण अजून ही अर्धवट म्हणायचे .. मी youtube या संस्थळावर शोध घेतला ..त्या पैकी हे काही पहावेत/एकावेत आगळेवेगळे असे व्हिडीओ...

वेंकटरमणा गोविंदा ..

गेल्या महिन्यात आमच्या कुटुंब कबिल्यासह [ या कबिल्यामधे घरातले आणि मामा मावश्यांची कुटुंबेही होती ! एकूण २५ जण .. ] तिरूपतिला जाऊन आलो. तसा मी तिथ आता पर्यंत ५-६ वेळा जाऊन आलोय.. मस्त जागा आहे. मला तरी तिथलं वातावरण खूप भारी वाटतं ! दिवस भर हुंदडायच आणि भूक लागली की फ्री मिल मधे किंवा स्टॉलवर भातावर ताव मारायचा ! मला खरतर डोंगर चढत जायच होतं पण यावेळेस असं फार काही करता आलं नाही. :( पुढल्यावेळी नक्की करणार आहे . .. तीन दिवस थांबलो होतो तिरूमला मधे, [ तिरूपती हे गाव पायथ्याशी येतं आणि व्यंकटेश्वराचे देवस्थान आहे डोंगरावर तिरूमला मधे ] तिरूमला हे डोंगरावर आहे त्यामुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न होतं एकदम आल्हाददायक ... आमच्या स्वागताला स्वत: वरूण राजे ही हजर झाले त्यामुळे प्रवासाचा शीण ही गेला.. [ आणि पुढे ही वरूण राजाने लुड्बुड न करता दडी मारल्याने फिरायचा उत्साह ही टिकला ! :P] पहिल्या दिवशी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पहिला शोध घेतला तो चांगल्या हॉटेल्चा .. आणि इतर सोयी पाहून वेळ घालवला.. दुसर्‍या दिवशी ११ वाजताच दर्शन होत. सव्वा तासातच श्री व्यंकटेशाचे दर्शन झाले.. लाडू घेतले. .. :D ब...

लेखनप्रयोग

खरंतर मी ब्लोग सुरू कराव अस काही ही घडलं नाहीय पण तरीही हा प्रयोग प्रपंच. रोजच्या कामात असताना किंवा रिकामं बसलेलं असताना काही विचार मनात येतात, कधी आनंदाचे, निराशेचे, निरागस, लोभस .. शेकडो विचार असतात या मनात .. इथे माझे विचार मी मोकळेपणाने मांडणार आहे. मला गाणी आवडतात, सिनेमातली किंवा गझल भावगीत सुद्धा.. मला काही English गाणी आवडतात. त्या बद्दल लिहायला आवडेल. खरंच, एखादीच ओळ आपला अख्खा दिवस गोड करु शकेल अशी किमया आहे या गाण्यांमधे .. मला चित्र काढायला आवडत .. पण मी इथे फक्त मला आवड्णारया चित्रांबद्दल बोलणार आहे .. सिनेमा .. त्यांचे प्रकार .. रोजची चटर पटर आणि असच काही बाही .. खरंतर मी मलाच तपासणार आहे .. त्रयस्थ नजरेतून ! ( की अस्वस्थ नजरेतून ?)

नातं.. कोडं.. आधार .. गरज.. नक्की काय ?

माणसाला कोड्याची ओढ खूपच आदिम काळापासूनची, स्वत:ला विविध प्रश्नांनी वेढून घेणं हा त्याचा छंदच होता जणू.. आणि तो आजतागायत आहे. मग ते कोणत्याही स्वरूपाचं ढंगाच असो. मला ही असे काही प्रश्न पडत असतात.. असाच एक प्रश्न.. "नातं" .. नात्याचा अर्थ, नाजूकपणा .. ब्ला ब्ला ब्ला मी इथ मांडणारच नाहीये.. त्यावर माझी लिहीण्याची ताकद नाही आणि मी लिहीलंच तर तुमच्यात ना ते सहन करण्याची.. फक्त मला प्रश्न पडलाय नातं म्हणजे काय.. न + आंत = नातं ? कित्येकदा असं सहज म्हणून जातो . अरे माझा अमुक अमुक आहे .. सहन करावं लागतं सांगतो कोणाला. खरतर दोन मनं जवळ आली की एक जे तयार होतं जे फक्त त्या दोघांनाच खर कळतं ते नातं (आता लगेच ते दोघ म्हणल्यावर प्रेम.. लफडी असे घासलेले शब्द मनातही आणू नका.. दोन गुंडांमधे पण नातं असतंच की मुन्नाभाई आणि सर्किट सारखं) मग त्या गोष्टीला नात्याची खरतर गरज नसते.. त्याला मैत्री अस नाव तरीही लोक देतातच.. माहित नाही का..कॉलेजमधे इतके मित्र होतात .. त्यातले किती संपर्कात रहातात.. त्तरीही आपण मित्र म्हणतो.. अडचणीच्यावेळी आपण एकमेकांना मदत करतो .. आपल्याशी काही नातं नसताना जेंव्हा मि...

मामाच्या देशाला जाउया

दुपारची टळटळीत उन्हाची १२ची वेळ.. मी आईला घेऊन घरी येत होतो. सिग्नल पडला आणि मी भर चौकात थांबलो. घामानं निथळलो होतो आणि आणि वैतागलो पण होतो .. आणि एव्ढ्यात एक व्हॆन शेजारी येउन उभी राहिली. गाडीत शाळेतली छोटी छोट्टी चुन्नू मुन्नू होती आणि चक्क लहानमुलांची गाणीच ऐकत होती .. " झुक झुक झुक अगीन गाडी .. धुरांच्या रेषा हवेत काढी .. " मी १० वर्ष मागे गेलो आणि क्षणार्धात परतलोही .. सिग्नल सुटला मीही निघालो.. पण विचार सुटेना ..विचार मनात चालूच होता. आज मुलं मामाच्या गावाला कुठे जातील .. समोरच्या बिल्डींगमधे किंवा दुस-या उपनगरात .. मामाच त्या शहरातला असेल तर पोरं जाणार तरी कुठे .. त्याना ते सुखच नाही .. जे मी आणि माझ्या भावंडांनी मिळवलं आणि मामा असलाच दुस-या गावी तर तो एकदम असतो दुस-या देशात.. मग मुलं काय म्हणतील .. काय करतील .. याच भावनेतून मी ही विडंबन कविता केली आहे .. पहा जमलीय का ते ? सूं.. सूं .. सूं सूं विमान जाई उंच ढगात झोके घेई देशांची नावे सांगू या मामाच्या देशाला जाउया जाउ या मामाच्या देशाला जाउया मामा माझा नोकरदार कंपनीच घर न दार उंच इमारती मोजु या मामाच्या देशाला जा...

कॅलिडोस्कोप

विविध रंगांचं.. आकारांचं.. विविध प्रतलांचं .. एक देखणं विश्व.. प्रकाशाच्या सानिध्यात साधे काचेचे तुकडे ही इतकी सुंदर निर्मिती करु शकतात याचं मूर्तीमंत उदाहरण. मला कॅलिडोस्कोपचं लहानपणापासून आकर्षण आहे. मी काही स्वत: जाऊन विकत घेतले आहेत वगैरे असं काही नाही. आमच्या वाड्यात एक घर होत. [ मी लहानपणापासूनच वाड्यात सर्व घरांमधे अप्रतिर्हत संचार करू शकत होतो. कारण मी एक तर सगळ्यात लहान आणि इतर माणसांचा (भाडेकरूंचा - हा शब्द मला तसा इथे चुकीचा वाटतो.) आवडता होतो. त्यामुळे मी कुठे ही असायचो. हां तर कुठे होतो मी ? हां कॅलिडोस्कोप.. तर आमच्या घरामागे त्याचं घर होतं त्यात एक चौकोनी कुटुंब रहायचं .. त्यातले काका शाळॆमधे गणित शिकवायचे आणि त्यांची दोन हुशार मुले व काकु. असं छान कुटुंब. तर ते काका मला अशा गमतीशीर गोष्टी दाखवायचे.. त्यानी मला एके दिवशी कॅलिडोस्कोप करून दिलेला. ]खरंतर खूप जुनी आठवण आहे ही.. मग त्याचा इथे काय संबंध.. आहे. आज आम्ही मित्र मित्र एकाच व्यक्तीबद्दल बोलत होतो. पण प्रत्येकाच मत वेगळं. खूप चर्चा आणि वाद. मग तो हेच करत नाही .. तेच करतो.. तो शिस्तीत शेंडी लावतो, आ...