Skip to main content

Posts

Showing posts with the label मनस्थिती

संडे हो या मंडे ..

आज खूपच दिवसानी प्रत्यक्षात युगांनंतर वाटत आहे. पण जलरंगात प्रत्यक्ष जागेवर बसून काम केल. पुणे विद्यापीठातलं जुनं कॅंटीन आहे हे. इथे कायम वर्दळ असते, मुला मुलींचे ग्रूप्स आणि प्रोफेसर लोकांची टोळकी .. [टाळकी] इथे चहा गप्पांसाठी येत असतात .. सतत रिक्षा कार आणि दुचाकी ये जा करत असतात .. आणि रस्ता ओलांडला की एक अत्यंत रम्य आणि निवांत असा बगीचा आहे. फार काहीच तिथे बागकाम केलेले नाहीय. पण तरी ही रम्य आहे ते तिथल्या वृक्षराजी आणि तळ्यामुळे... आणि शांततेमुळॆ आज खूप दिवसानी तिथे गेलो .. जुने कॉलेजचे दिवस आठवले .. स्केचिंग करता करता गप्पा माराय्च्या .. स्पॉट शोधत तास तास शोधत फिरायचं ..स्पॉट सापडला की आजुबाजुचे काही न पहाता लगेच बसून काम सुरु करायचे .. किंवा पाणे आणण्याच्या निमित्ताने इतरांची विशेषत: वर्गातल्या काही खास व्यक्तिंची चित्रे पहायची आणि त्यात ’मदत’ ’corrections' करून द्यायच्या आणि जरा मैत्री वाढवायची .. :P सग्गळ आठवलं पण आज ते आठवून ही काम करायची ओढ कमी झाली नाही की मी भूत काळात रमलोही नाही.. रमावेसे वाटलेही नाही..