Skip to main content

वेंकटरमणा गोविंदा ..


गेल्या महिन्यात आमच्या कुटुंब कबिल्यासह [ या कबिल्यामधे घरातले आणि मामा मावश्यांची कुटुंबेही होती ! एकूण २५ जण .. ] तिरूपतिला जाऊन आलो. तसा मी तिथ आता पर्यंत ५-६ वेळा जाऊन आलोय.. मस्त जागा आहे. मला तरी तिथलं वातावरण खूप भारी वाटतं ! दिवस भर हुंदडायच आणि भूक लागली की फ्री मिल मधे किंवा स्टॉलवर भातावर ताव मारायचा ! मला खरतर डोंगर चढत जायच होतं पण यावेळेस असं फार काही करता आलं नाही. :( पुढल्यावेळी नक्की करणार आहे . ..

तीन दिवस थांबलो होतो तिरूमला मधे, [ तिरूपती हे गाव पायथ्याशी येतं आणि व्यंकटेश्वराचे देवस्थान आहे डोंगरावर तिरूमला मधे ] तिरूमला हे डोंगरावर आहे त्यामुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न होतं एकदम आल्हाददायक ... आमच्या स्वागताला स्वत: वरूण राजे ही हजर झाले त्यामुळे प्रवासाचा शीण ही गेला.. [ आणि पुढे ही वरूण राजाने लुड्बुड न करता दडी मारल्याने फिरायचा उत्साह ही टिकला ! :P] पहिल्या दिवशी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पहिला शोध घेतला तो चांगल्या हॉटेल्चा .. आणि इतर सोयी पाहून वेळ घालवला.. दुसर्‍या दिवशी ११ वाजताच दर्शन होत. सव्वा तासातच श्री व्यंकटेशाचे दर्शन झाले.. लाडू घेतले. .. :D बर्‍याच ठिकाणी प्रसादावर ताव ही मारला.. मोफत प्रसादाचा अनुभव घेतला [ अनुभवच .. एक वेळेस काही हजार माणसं जेवताना पहाणं आणि त्यातला एक भाग असणं हा एक अनुभवच नाही का ! ] तिसर्‍या दिवशी तिथली आधी पाहिलेलीच पापविनाशनम, आकाशगंगा, वेणूगोपाल मंदीर, विष्णू पद, शीलातोरण अशी ठिकाणे ही पाहिली.
मला तिरूमला वर रहाणं का कुणास ठाऊक अगदी सहज वाटतं .. अनोळखी असं वाटतंच नाही. त्यामुळे एकदम मस्त वाटलं .. बर्‍याच वेळा मी एकटाच फिरून आलो .. खूप फोटो काढले.. ते इथे टाकले आहेत
तिथल्या एक चहावाल्याशी पण आमची मैत्री झालेली.. व्हायचं काय की , सगळे जमले की पत्त्याचा डाव रंगायचा .. गड्ड्या झब्बू .. नाहीतर बदाम सात .. जो गाढव होईल त्याने चहा सगळ्यांना द्यायचा .. त्यामुळे दिवसा रात्री कधीही .. मनात आलं की आम्ही या चहावाल्याकडे जायचो .. आणि फर्माईशी सुरू .. बर ते पाहून इतर चहावाले ही वैतागलेले... शेवटच्या दिवशी आम्ही सांगीतल की उद्या आम्ही नाहीय . तेव्हा त्याचा चेहरा पडला ... त्याचे काही व्हिडीओज इथे टाकले आहेत एकूण ट्रीप मधे धमाल मजा आली
काही गोष्टी मात्र खटकल्या त्या म्हणजे सर्व मंदीरांच व्यवसायिकरण झालं आहे . तिकीटाने दर्शन होतं .. खूप बाजार मांडला आहे याचा भाव मनात दाटून येतो. पण ते कुठे नसत ? .. सगळीकडे तेच आहे. .. असो .. चांगली गोष्ट अशी की किती ही झालं तरी सोयी ही तितक्याच आहेत . .. रस्ते फूटपाथ स्वच्छ आहेत .. खूप कमी, [ खरंतर नगण्य ] भिकारी दिसतात .. धर्मशाळेत खूप चांगल्या स्वच्छ रूम आहेत .. गरम गार पाण्याची २४ सोय सर्वत्र आहे .. अश्या अनेक सोयी मोफत वा खूप कमी खर्चात मिळतात.. :)


तिरूमला पाहिल्यावर आम्ही तिरूपति मधे खाली उतरलो .. आणि तिथे पद्मावति, गोविंदराज मंदिरांमधून दर्शने घेतली .. मग रेलवे स्थानकावर आलो आणि हरिप्रिया एक्स्प्रेस ने कोल्हापूर गाठले .. दोन दिवस तिथे थांबलो .. दुसर्‍या दिवशी देवीला अभिषेक केला .. प्रसाद घेऊन पुण्याला पोहोचलो...

तुम्ही कधी गेलाय तिरूपतिला ? काय नवीन पाहिल ते जरूर सांगा !

Comments

Popular posts from this blog

टॅगा टॅगी .. - खो !

हेह्हे .. मस्तच आहे ही कल्पना . . . कुणीही मला टॅगल नाहीय . . आणि टाकलं ही नाहीय .. तरीही लिहीलंय .. :)       ये... मला पण कांचन ताईने  आधीच टॅगल होतं पण लिंक चुकीची होती म्हणून कळायला उशीर झाला ..असो .. : हॅप्पी ! : 1.Where is your cell phone? माझ्या कामाच्या टेबलावर 2.Your hair? काळे सरळ .. शहाण्या मुलासारखे !! :P 3.Your mother? शिक्षिका, माझ्या कलाकृतिंची पहिली प्रेक्षक आणि टीकाकार.. 4.Your father? शास्त्रज्ञ .. आणि प्रेरणास्थान .. :) 5.Your favorite food? तर्री मारलेली मिसळ, मग फोडणीची पोळी, पुरणपोळी, मराठी सर्वच्या सर्व पदार्थ.. [मुद्दाम म्हणून कार्ले, मुळा आणि शेपू बंद ..] चायनिज मधील सर्व व्हेज ..इटालियन पास्ता व इतर काही डिशेस.. बाकी आंतरराष्ट्रीय खाणे अजून खाल्लेले नाही.. एकूण मी खाद्यसंस्कृतिरक्षक आहे... :D

पंचममय शाम

"कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का लेलो मजा.. " काल रात्री आर डी च्या चाहत्यांनी म्हणजे पंचम मॅजिक या संस्थेने आयोजित कार्यक्रमाला गेलेलो. टिळक स्मारक मंदिरात नऊ वाजताचा कार्यक्रम होता, पण माझे काम लवकर आटोपल्याने साडेआठलाच पोहोचलो, मला आयोजाकापैकीच एकानी बोलावले होते त्यामुळे पास मिळाला होता, आधीच आत जाऊन बसलो होतो .. आत गेलो तर एक ३०-४० टाळकी गप्पा मारत मारत काम करत होती .. सगळी माझ्यापेक्षा १०-२० वर्षांनी मोठी .. मला वाटल आता बोर होणार कार्यक्रम सुरु होईपर्यंत पण हळूहळू त्याच्या गप्पात मी कधी मिसळलो ते कळलेच नाही. स्टेजवर मोठा पंचमदांचा फोटो, त्याच्याजवळ स्क्रीन, कडेला स्टेन्डवर पंचमचेच तैलचित्र, काळे [ फक्त याच कार्यक्रमासाठी पंचमचे फोटो प्रिंट करून तयार केलेले ] टी-शर्ट घालून कामात गर्क असलेली माणसे, आणि मोठ्यांदा लावलेलं हे गाणं! त्यातही वेगवेगळया विषयावर आणि टाईमपास गप्पा व चहा! जो महोल तयार झाला होता तो खरोखर अवर्णनीय! आर. डी. मय झाला होत सर्व .. हा खरोखर आर. डी. चा करिष्माच आहे कि फक्त एका माणसाच्या प्रेमापोटी, जो त्यांना आयुष्यात कदाचित भेटला असेल वा नसे

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो .. सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.