Skip to main content

टॅगा टॅगी .. - खो !

हेह्हे .. मस्तच आहे ही कल्पना . .. कुणीही मला टॅगल नाहीय .. आणि टाकलं ही नाहीय .. तरीही लिहीलंय .. :)      ये... मला पण कांचन ताईने  आधीच टॅगल होतं पण लिंक चुकीची होती म्हणून कळायला उशीर झाला ..असो .. : हॅप्पी ! :


1.Where is your cell phone?
माझ्या कामाच्या टेबलावर

2.Your hair?
काळे सरळ .. शहाण्या मुलासारखे !! :P

3.Your mother?
शिक्षिका, माझ्या कलाकृतिंची पहिली प्रेक्षक आणि टीकाकार..

4.Your father?
शास्त्रज्ञ .. आणि प्रेरणास्थान .. :)

5.Your favorite food?
तर्री मारलेली मिसळ, मग फोडणीची पोळी, पुरणपोळी, मराठी सर्वच्या सर्व पदार्थ..
[मुद्दाम म्हणून कार्ले, मुळा आणि शेपू बंद ..]
चायनिज मधील सर्व व्हेज ..इटालियन पास्ता व इतर काही डिशेस.. बाकी आंतरराष्ट्रीय खाणे अजून खाल्लेले नाही..
एकूण मी खाद्यसंस्कृतिरक्षक आहे... :D

6.Your dream last night?
आमच्या घरातील सर्वच्या सर्व जण [काका, काकू आणि त्यांची मुले..] एकत्र कोणत्यातरी देवळात गेलो आहोत .. आणि आमच्याबरोबर आजी पण आहे .. जी खूप खूष आहे.. :( ..
सकाळ पासून डोक्यात चित्र नाचत आहे .. :( .. आधी आम्ही एकत्र रहायचो .. एका मोठ्या वाड्यात ..


7.Your favorite drink?
च हा .. मग इतर सटर फटर चालतात .. पण सरबत म्हणाल तर कलिंगडाच !

8.Your dream/goal?
माझ्या आईवडिलांना युरो टूर घडवायची आहे...
आणि माझा स्वत:चा स्टुडिओ जो डीझाईन क्षेत्रात उच्च स्तरावर काम करत असेल ..

9.What room are you in?
माझ्या छोटेखानी ऑफिसमधे.. जिथे दोन मुंडक्यांच्या कॉम्पुटर वर मी कामे करतो.

10.Your hobby?
मी छंदीष्ट आहे.. कसलाही छंद मला लागू शकतो [ओ . चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहे मी :D ] .. त्यातून कायम झालेले ..photography, संगीत ऎकणे ..
चित्रकला मी छंदात लिहिणार नाही कारण ती माझी जीवन वाहीनी आहे.. वहाते रंग अनुभवले की मनातली मरगळ कुठल्याकुठे निघून जाते !

11.Your fear?
खूप छोटी छोटी असतात .. मोठ्या गोष्टी केल्यानंतर लक्षात येतं की हे लोक करायला घाबरतात .. आपण आधीच सहज करून बसलोय !!
[एकच ठरवलंय "डर के आगे जीत है ! "]

12.Where do you want to be in 6 years?
माझ्या स्वत:च्या घरात आणि हापिसात .. [स्टूडिओत !! :) ]

13.Where were you last night?
हापिसात .. एक नवीन गोष्टीवर RND सुरु आहे , :)

14.Something that you aren’t diplomatic?
सर्व आप्त स्वकीयांशी ..

15.Muffins?
yumm .. खरं तर हा प्रश्न आहे?

16.Wish list item?
१.
२.
३.

माझ्यासमोर ब्रह्मदेव आला आणि म्हणाला की तुला काय हव ते माग ..तरी तेव्हाही काही सुचायच नाही.. इतक ब्लॅन्क व्हायल झालं आहे आत्ता .. आठवलं की लिहीन .. i mean हे हवच आहे असं वाटलं अगदी मनापासून की मग.. तोवर its blank.. :\

17.Where did you grow up?
पुणे .. सदाशिव पेठ ..

18.Last thing you did?
आई वीणा बरोबर दुपारचं जेवण .. त्या आधी काही बारीक सारीक कामे उरकली.. :)

19.What are you wearing?
केशरी बारीक रेघांचा शर्ट आणि करड्या तपकिरी रंगाची पॅंट .. पण तसं काही खास आवडतं असं ही नाही.. :)

20.Your TV?
mostly off.. youtube is my new tv. Discovery and discovery living is my fav channel.
some time sports ..

21.Your pets?
आवडतात पण चित्रात ..

22.Friends
मोजकेच मित्र आहेत पण सगळे जीवाभावाचे ..

23.Your life?
versatile .. yet stable ..

24.Your mood?
शांत


25.Missing someone?
हो ..

26.Vehicle?
इटर्नो ..

27.Something you’re not wearing?
राग .. मत्सर ..

28.Your favorite store?
व्हीनस ट्रेडर्स .. स्टेशनरीच्या दुकानात गेल्यावर मला आजही हरखून जायला होतं हमखास शंभराची नोट जाते.. इतकया मस्त मस्त गोष्टी असतात तिथे !!

Your favorite color?
कोणताही निळा ..
त्याच्या इतका मस्त रंग नाही ..

29.When was the last time you laughed?
काल रात्री शांतेच कार्ट हे नाटक पाहिल .. कितव्यांदा ते आठवत नाही .. तेव्हा .. काय टाय्मिंग आहे !!

30.Last time you cried?
आजोबा गेले तेव्हा आणि त्यांच्या वर्ष श्राद्दाचे वेळी इतर सर्व त्याना विसरले आहेत ते कळाले तेव्हा ....

31.Your best friend?
आई

32.One place that you go to over and over?
श्रीकृष्ण भुवन,तुळशीबाग, मंडई, पुणे.. हा पत्ता आहे ..तुळशीबाग व मंडईत जात नाही मी ! म्हण्जे आवडत जायला पण मी वारंवार जात नाही...

33.One person who emails me regularly?
गिनी, राजूकाका, विनायक [याच्या इमेल आता कमी झाल्यात ..]

34.Favorite place to eat?
घर
श्रीकृष्ण भुवन,तुळशीबाग, मंडई, पुणे
जनसेवा, लक्ष्मी रोड, पुणे
गगनबावड्याची मिसळ कोल्हापूर ..
तिलक उपहार गृह, टिळक रस्ता पुणे
बरीच आहेत ..


हुश्शा .. संपली प्रश्नावली.. आता खो द्यायची वेळ .. कुणाला बरं द्यावा?? हं जास्वंदी, स्नेहा भाग्यश्री विशुभाऊ आणि प्रभास ला ..

Comments

अरे व्वा, खुप मजेदार लिहिलयं वीरेंद्रजी... खुप आवडलं, तुमच्या कॉम्प्युटरच्या दोन मुंडक्यांबद्दल जरा नीट खुलासा करा... ;)
Veerendra said…
विशाल .. मला अहो जाहो पेक्षा अरे तुरे कर ..जास्त चांगल वाटेल .. :) अरे एकाच cpu ला दोन मॉनिटर जोडले आहेत .. कधि तरी फोटो टाकेन इथे !
Suhas Zele said…
छान आहे हा टॅग...सगळेच खो देत आहेत..फार छान कल्पना आहे ही..हो की नाही?
Veerendra said…
ho na ...
dhanyawad tuzya comment baddal !
मित्रा, खो मस्त दिला आहे... पण मला काही कळत नाही....

कांचन ने पण मला टॅगले आहे.... बघतो तिथे काय आहे ते...

आपला,
(गोंधळ्या) विशुभाऊ
Veerendra said…
विशुभाऊ .. अहो टॅगिन्ग म्हणजे खेळच आहे.. वर दिलेले प्रश्न आहेत तसे कॉपी करा आणि त्याची उत्तरे द्या. आणि मग टॅग करा कुणालातरी आणि सांगायच त्याना .. कारण ट्वीटर सारख इथे होत नाही .. :(
असो .. खो खो सारखाच प्रकार आहे .. :D
Anonymous said…
वीरेंद्र,
मस्त लिहिलस!! कांचन ने तुला( चालेले न ) tag दिला म्हणून आले. पहिल्यांदाच येते, पण रायटिंग छान आहे. निवांत पणे सर्व वाचीन. येत राहीन. असाच लिहित रहा. भेट दे अनुक्षरे ला आवडेल. बाय
Veerendra said…
धन्यवाद .. तुझ्या (मला चालेल! तुला ? :D )
प्रोत्साहनाबद्दल .. आणि हो अनुक्षरे मी मधुन मधुन वाचले आहे.. छान आहे तुझा ब्लॉग ..
:)
मजा आली हा खोखो खेळताना... अधिक माहिती पण मिळाली सर्वांबद्दल. लिहीत राहणे.

Popular posts from this blog

आवडता पक्षी - मोर

ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D


आवडता पक्षी - मोर

मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो ..
सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.

Thank you Orkut !!

ओर्कुट ...
Profile views: Since Feb '06: 20,586, Last week: 12, Yesterday: 1

२००६ साली मी अरेना मधे शिकत होतो (?) .. प्रश्नचिन्हाकडे टक लावून पाहू नका .. ते ते का आहे ते परत कधी तरी सांगीन.. अनुजा नावाच्या एका बोलघेवड्या मैत्रिणीने मला या ओर्कुट नावाच्या कम्युनिटीवर जवळ जवळ खेचूनच आणलं .. तिच आपलं सारखं चालायच .. ही कम्युनिटी आहे तो ग्रुप आहे.. असं आणि तसं .. शेवटी आलोच .. कोणीच मित्र नव्हते .. काय आहे ते ही कळत नव्हत .. पण तरी ठीक वाटलं .. तेव्हा मी एक्दाच फ़ेसबूक वर जाऊन आलो होतो आणी माय्स्पेस पण वापरल होतं तसंच काही असेल असं वाटलं होतं .. पण हे भलतंच होतं ..
परवा सहजंच चाळता चाळता अगदी पहिल्या स्क्रॆप पासून चाळायला सुरुवात केली आणि अनेक टाईमपास .. सिरीयस आठवणी जाग्या झाल्या .. काही स्क्रॅप देत आहे ..
हा पहिला वहिला ..

Anuja:
Hi avadale na! bagh mi sangat hote na join ho mhanun. any ways aata tuzya avadichya ani itar communities bagh. specially Sandeep Khare & Saleel Kulkarni By