Skip to main content

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो ..
सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.
फुटपाथ वर चालणारी टोळकी, जोड्या आणि इतर माणसे.. फोटो, कॅलेंडर, पुस्तक विक्रेते, खेळ करून पैसे मागणारी मुले .. हॉटेलच्या बाहेर वेटिंगवर असलेल्या रांगा.. आणि  त्यातूनच  जाणाऱ्या गाड्यांचे लोंढेच्या लोंढे .. होर्न, शिट्ट्या, सगळं कस जिवंत करत होत्या .. आदिदास, नायके, आलेन सोली, रेबोक आणि आणखीन कसल्या कसल्या जड उच्चाराच्या brandsची दुकाने लक्षवेधून घेत होती .. विविध प्रकारचे branding केलेले बस थांबे .. वाट  पाहाणारी माणसे.. सगळं कस ओघवतं .. वेगवंत..
माझाही मधुनच एखादा एस एम एस ,tweet, हे पण चालू होत. .. संभाजी बागेजवळ आलो .. इथे आमच पाहिलं निसर्गचित्रण झालं होत ... पहिल्यांदा मी निसर्गात बसून चित्र काढलं.. ते कस आल होत हा वेगळा भाग पण तरी ही ती घटना स्पष्ट आठवली ..साहजीकच कॉलेजच्या बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून झर्रकन निघून गेल्या, पावसात केलेले वाढदिवस, गप्पाटप्पा, दुपारीतीपारी फिरून केलेली स्केचेस.. सबमिशन पूर्ण करण्यासाठी केलेली निसर्गचित्रे, काही खास मैत्रिणींना मैत्रीखातर केलेली 'मदत !', [ फक्त नशिबाने ती फक्त त्यांच्याच फायद्याची होती, नंतर आम्हाला कळल कि आमच माकड झालं,  ते निराळं ! ]    .. हॉटेल्स समोरून जाताना काही भेटी गाठी आठवल्या .. माझ्या काही नको झालेल्या आठवणी आणि काही अविस्मरणीय ही.. समोरून अनेक दुकाने माणसे वाहने आणि बरेच काय काय येत होती.. जात होती ..
चालता चालता मेक्डोनाल्ड ला कधी पोचलो तेही  लक्षात आल नाही .. या कंपनीच्या दुकानात .. उपहारगृहात मी कधी गेलो नाही .. आणि जाण्याची शक्यता ही नाही पण तरी ही यांच कौतुक वाटल मला .. त्यानी मुख्य पाटी मराठीत लिहिली आहे .. आणि इंग्रजीत कुठेच नाहीय .." कमाल आहे!" मनसे ला धन्यवाद ही दिले .. पण !..  नंतर लक्षात आल कि इथे मनसे चा काहीच संबंध नाहीय, त्यांचा त्यांच्या ब्रांडवर इतका जबरदस्त विश्वास आहे ... कि नुसता m जरी दिसला तरी ज्याला मराठी येत नाही तो हे सहज समजेल कि हे माक्डोनाल्ड्च आहे .. आणि तो इतरत्र जाणारच नाही .. उगाचाच नाही तो लोगो जगातल्या श्रेष्ठ लोगोपैकी एक!
हळूहळू रस्त्यावर खायच्या गाड्या, टपऱ्या दिसू लागल्या .. आणि वेग वेगळ्या वासामुळे माझ्या चालण्याच्या वेगावर ही परिणाम होऊ लागला .. म्हणून मी सरळ रस्ताच क्रॉस करावा म्हणून पुढे गेलो ..तर १० मिनिटे वाट पाहिल्यावर मी रस्त्याच्या त्या टोकाला जाऊन पोचलो .. तेव्हा मला उगीचच एक अचिव केल्याचे समाधान लाभले .. उगाचच !! :D .. पण तेव्हा मला कळलं रस्ता क्रोस करण किती अवघड होत चालल आहे ते ! आपल्याला इतका त्रास होत असेल तर म्हाताऱ्या लोकांच काय होत असेल ?
डेक्कन थेटराच्या पुढ्यातून हळू हळू मी संभाजी पुतळ्याजवळ आलो .. ह्या पुलाखालून रस्ता क्रॉस करून पलीकडे जावे या विचाराने मी कडेला पायऱ्याच्या दिशेने गेलो तर तिकडे एक चोरीचा माल विकणाऱ दुकान दिसल आणि तुमच्या आमच्या सारखे लोक तिथे खरेदी करत होते उघड ..
"साहेब कोणती डीवीडी देउ ? काय पाहिजे बोला .. सगळं आहे .. " एक मला म्हणाला..
मीपण उगाच आव आणत पाहत होतो ..झाकीर हुसेन, भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, जगजीत सिंग  कितीतरी होते .. त्यांच्या कलाकृतींचे मूल्य ते ही सर्व कलाकृतींचे मूल्य .. फक्त ६०/- साठ रुपये ..अनेक लोक घेत होते .. अवतार या चित्रपटाचे एकाला ३d version पायरेटेड मध्ये हवे होते, कमाल आहे लोकांची ! .. इंग्रजी मराठी हिंदी .. अगदी आत्ता प्रकाशित झालेल्या चित्रपटांच्या DVDs...  शेवटी पंचरत्न चीही डीवीडी दिसल्यावर निघालो, पायरसी इतकी झाली आहे .." उघड लोक विकत आहेत तरी पोलीस काही करत नाहीत हेच आश्चर्य !" हे वाक्य मनात म्हणून स्वत:वरच हसलो .. दुसर्याबाजूने पायऱ्या उतरून खालच्या बाजूस आलो तर वेगळ्याच गोष्टींचा बाजार होता .. खेळणी .. गजरे .. आणि कसले कसले पथारी वाले .. आता थोडा वैताग यायला लागला होता मला .. तेच तेच पाहून .. विशेषत: त्या सीडी च्या पथारी नंतर .. ते ओलांडून पलीकडे कसा बसा  पोचून पायऱ्या चढून वर आलो तर वेगळाच नूर होता .. चितळे, काका हलवाई, आर पी वैद्य, अशी एक एक दुकान ! ती पालथी घालत मी गोखले चौकात [म्हणजे गुडलक चौक! :\ ] पोचलो ..मला माहित नव्हत कि small नावच फक्त लहान मुलाचं ३ मजली दुकान आहे गुडलक कॅफे च्या मागे!
इतका चाललो तरी पाय थांबायचे नाव घेत नव्हते.. का कुणास ठाउक ? कदाचित माझी आजची संध्याकाळ खूपच भारी असणार होती .. म्हणूनच कि काय  मी पुढे चालत होतो .. वाडेश्वर गेलं .. वैशाली, रूपाली .. आम्रपाली .. सर्व उपहारगृहे गेली .. पण मी गर्दीचा भाग बनून चालत होतो, नसते दागिने, बांगड्या खरेदी करणाऱ्या पोरी सोरी .. दारूच्या दुकानापुढे रेंगाळलेली पोरटी, हातागाड्यांपुढे झालेली गर्दी, सगळ बाजूला सारत मी जात होतो ..
विचार केला रे आर्ट gallery जवळ काही जुने मित्र अजून ही भेटतात अशी वदंता आहे ..  त्यांना शोधाव असले तिथे तर एखादा चहा मारू आणि परतीच्या वाटेला लागू .. पण छे ! एकपण नव्हता ..
मी आता परतीचा विचार करत होतो .. आणि ब्रिटीश लायब्ररी जवळ पोचत होतो आणि पाहतो तर काय .. डोळ्यावर विश्वासच बसेना .. माझ्या पुढ्यात .. चक्क एक आय स्टोर ... मी धावत आत गेलो .. समोर मेटल आणि प्लास्टिकमध्ये बनवलेली शिल्पेच होती .. mac books, mac book air, desks, towers, mac .. mac आणि mac .. apple पुण्यामध्ये दुकान थाटेल अस मला वाटल होत पण लगेच माझ्या समोर येईल असे नव्हते वाटले .. आणि गम्मत म्हणजे .. दुकानातली सर्व मुले .. almost सर्वच .. मराठी होती .. मराठीमधून माहिती दिली त्यांनी.. मी वेडाच व्हायचं राहिलो होतो..  मनोमन समाधान होई पर्यंत त्या माणसाने मला mac पाहु दिला .. मी स्वत: हात लावून वापरला ... [कदाचित मला आता आधीच्या पोस्त मधल्या wish list मध्ये mac book हे टाकाव लागणार !! ] :) .. नंतर त्याने किमती सांगितल्या .. आणि मग मी पटकन निघालो .. :D  पण एक दिवस एक तरी mac नक्की घेणार हे ठरवून .. आता माझी बोरिंग संध्याकाळ अतिशय भारी झाली होती हे नक्कीच .. अगदी अविस्मरणीय !

Comments

Anonymous said…
हे हे हे!

याला काय म्हणु - "एक उनाड संध्याकाळ" ?
Veerendra said…
हा हा हा ... नक्कीच !
भुंगा said…
मस्त निरिक्षण आहेत...मराठी मॅकडोलाल्ड - मॅकवाले मराठी - हे स्वप्न तर नव्हतं ना?
पण काही असो... स्वप्नवत असलं तरी मस्त वाटलं वाचताना... !
अशीही भटकंती करायला पहिजे कधीतरी. मस्त जमून आलाय लेख. असे वाटत होते मी पण तुझ्यामागोमाग येतोय.

Popular posts from this blog

आवडता पक्षी - मोर

ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D


आवडता पक्षी - मोर

मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.

Thank you Orkut !!

ओर्कुट ...
Profile views: Since Feb '06: 20,586, Last week: 12, Yesterday: 1

२००६ साली मी अरेना मधे शिकत होतो (?) .. प्रश्नचिन्हाकडे टक लावून पाहू नका .. ते ते का आहे ते परत कधी तरी सांगीन.. अनुजा नावाच्या एका बोलघेवड्या मैत्रिणीने मला या ओर्कुट नावाच्या कम्युनिटीवर जवळ जवळ खेचूनच आणलं .. तिच आपलं सारखं चालायच .. ही कम्युनिटी आहे तो ग्रुप आहे.. असं आणि तसं .. शेवटी आलोच .. कोणीच मित्र नव्हते .. काय आहे ते ही कळत नव्हत .. पण तरी ठीक वाटलं .. तेव्हा मी एक्दाच फ़ेसबूक वर जाऊन आलो होतो आणी माय्स्पेस पण वापरल होतं तसंच काही असेल असं वाटलं होतं .. पण हे भलतंच होतं ..
परवा सहजंच चाळता चाळता अगदी पहिल्या स्क्रॆप पासून चाळायला सुरुवात केली आणि अनेक टाईमपास .. सिरीयस आठवणी जाग्या झाल्या .. काही स्क्रॅप देत आहे ..
हा पहिला वहिला ..

Anuja:
Hi avadale na! bagh mi sangat hote na join ho mhanun. any ways aata tuzya avadichya ani itar communities bagh. specially Sandeep Khare & Saleel Kulkarni By