Skip to main content

Thank you Orkut !!

ओर्कुट ...
Profile views: Since Feb '06: 20,586, Last week: 12, Yesterday: 1

२००६ साली मी अरेना मधे शिकत होतो (?) .. प्रश्नचिन्हाकडे टक लावून पाहू नका .. ते ते का आहे ते परत कधी तरी सांगीन.. अनुजा नावाच्या एका बोलघेवड्या मैत्रिणीने मला या ओर्कुट नावाच्या कम्युनिटीवर जवळ जवळ खेचूनच आणलं .. तिच आपलं सारखं चालायच .. ही कम्युनिटी आहे तो ग्रुप आहे.. असं आणि तसं .. शेवटी आलोच .. कोणीच मित्र नव्हते .. काय आहे ते ही कळत नव्हत .. पण तरी ठीक वाटलं .. तेव्हा मी एक्दाच फ़ेसबूक वर जाऊन आलो होतो आणी माय्स्पेस पण वापरल होतं तसंच काही असेल असं वाटलं होतं .. पण हे भलतंच होतं ..
परवा सहजंच चाळता चाळता अगदी पहिल्या स्क्रॆप पासून चाळायला सुरुवात केली आणि अनेक टाईमपास .. सिरीयस आठवणी जाग्या झाल्या .. काही स्क्रॅप देत आहे ..
हा पहिला वहिला ..

Anuja:
Hi avadale na! bagh mi sangat hote na join ho mhanun. any ways aata tuzya avadichya ani itar communities bagh. specially Sandeep Khare & Saleel Kulkarni Byआता ह्या कम्युनिटी कुठे शोधू .. आणि काय करू ... सर्च बॉक्स मधे टाकलं काहीतरी आणि परिणाम आले .. आणि खरोखर संवादाची नवी दालने उघडली .. मी मुद्दामच या वेळॆस ओळखी पेक्षा अनोळखी लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला .. [rather सगळेच अनोळखी होते .. पण तरी] जोएल, प्रणव, केरळचा गिनी, दिल्लीची नेहा.. अजून बरेच आहेत .. आणि विशेष म्हणजे ते अजून ही ओर्कुटवर आहेत .. बर्‍याच जणांशी संपर्क तुटला .. परत जोडला गेला .. काहीनी ठेवला नाही हा भाग वेगळा असला तरी आता एक्दम भारी वाटतय !! त्यांच्या प्रोफाईल परत पहाताना .. काही वर्षानंतरचे त्यांचे फोटो पहाताना एक्दम नॉस्टल्जिक झालं .. [ok फार नाहीय .. पण आहे :)]
असेच काही स्क्रॅप ..

प्रणव Pranav:
Hi...marathit tuze naav ghe...विरेंद्र...tu manogat.com var jaa...kinva mag "marathi kavita" community var eka topic madhe marathi editor chi mahiti ahe...

Louis:
veerendra,
i saw ur work in ur album....superb...hey d pic of sivaji is too gud ...lemme know which medium u used in dat,btw is it a paperwork or done with 3dmax or something.....

Anuja:
aaj mamni kharach khup chan modling karun dakhavale. polymodling madhun face kasa karayacha te sangitale. tu 1 mahinyache paymnt karun thode diwas yeu shakat nahi ka? 3d sanpes toparyant. arenachya logovar jo bettel ahe na to dakhavala. bagh try kar yenyacha. may b tula te sagale mahitahi asel pan amhala baryach navin ghosti kalalya. [अरेना मधे गेलो नव्हतो त्या दिवशी . .. :P]

smita:
hey ur poem was good but i didnt like the idea because i like himesh reshmeya. i think he is very good music director and also a good singer. i agree that his songs r sounding monotonous now but still he is doin a great job........
Reply Reply by chat
[तेव्हा एक कम्युनिटी आली होती .. I hate himesh reshmiya.. मी अजून ही मेंबर आहे ! :)]

Usman:
hey how u doin i havnt da faintest idea who u r.....but thanks for da advise i know dat i gotta work on it a lot...but i cudnt find any textures so i made my own from different images.....
by da way an introduction wud be nice yo......
so a do designing 2 dats kool...
Reply Reply by chat

:)

smita:
change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic......change ur profile pic..... [प्रोफाईल फोटो बदलायचा हा कसला आग्रह !! :D]

Guru:
nice work in your album yaar..
where have u learnt ?? [ असे तर खूप सापडले .. माझा मोठे पणा नाही पण हे ओर्कुटमुळेच शक्य झालं की माझ्या कामावर लोकांची मतं कळाली..]


वेगवेगळ्या कम्युनिटीज वर गप्पा मारताना व नवीन मित्र करताना वेळ आणि वर्षे कशी गेली ते कळालेच नाही..मित्र मिळाले म्हणून सांगायचे झाले तर ...
नेविल डिसोजा पहिला येतो .. एक नंबर कलाकार ... याच्या कलाकृतीची निवड एका जगातल्या मोठ्या नावाजलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्टासाठी नुकतीच झाली आहे .. पण तरीही एकदम Down to earth .. [कदाचित वजनामुळे असेल !! :P ]...[या नेविल ची तर कमाल आहे .. स्क्रॅपबुक मधे १, २, ३, आसे स्क्रॅप टाकत रहायचा .. आणि ५० झाले की मग ह्याचं hi!] btw ही एक गम्मतच होती [रादर बावळटपणाच ! की एखाद्याचा ५०, १०० च्या पटीत्ला स्क्रॅप झाला की अभिनंदन करायच !! :P ]
समीर केतकर [हा माझ्याच कॉलेजला होता .. पण कॉलेज संपल्यावर ह्याच्याशी माझी मैत्री झाली ती ओर्कुटवरच !! ]
किरण वेल्हाणकर [आम्ही एकाच कॉलेजचे फक्त हे मला खूप सिनीयर आहेत .. दोन गल्ल्यांच अंतर आम्च्या घरात आहे .. पण ओळख झाली ओर्कुट्वर ..],
कोल्हापुरचा अमर निकम.. [ह्याच्या ३D कामाने मी वॆडावलो होतो तेव्हा आणि आताही त्याच काम जबरदस्त आहे यात वाद नाही .. पण हा भारी माणूस आहे.. कोल्हापुरात माझे नातेवाईक असतात .. पण तिथला हा पहिलाच मित्र :) !]
केरळचा गिनी .. याच्याशी माझा खूप सा परिचय झाला नाही पण तरी आजही आम्च्या इमेल एकमेकाना असतात .. तो सॉफ्टवेअर कंपनीमधे काम करतो आणि एकदम मस्त माणूस आहे..

Gini:
hai man,, these r nice..
do well, nest wishes..
where r u working ?
And i am in search of u for clarifying my doubts in 3Dmax( Selfstudy, not course ha ha ha)
ok tc
keep in touch
--- Reply

अमरावतीचा श्याम देशपांडे .. याच्या बद्दल लिहाव ते थोड आहे.. उत्तम चित्रकार, चांगला माणूस.. हा सध्या लुकास आर्ट मधे आहे सिंगापूर ला .. माझ्या दृष्टीने एक celebrity च!... आणि विशेष म्हणजे हा जेव्हा पुण्यात होता त्यावेळेस आम्ही भेटलो आणि त्याला काही मदत पण करू शकलो हे भाग्यच !..

तेजस्विनी लेले.. हिला अलिबागची म्हणलेलंच बर! नाही तर माझं काही खरं नाही.. खरोखर काही ही संबंध नसताना एक अगाऊ पणामुळे हीचि माझी ओळख झाली.. ही लिहीते .. ब्लॉग लिहीते .. वाचण्यासारखे मराठी काही नेटवर असते ते मला हिच्या मुळॆ कळ्लं .. हिला फोटोशॉप शिकायची आवड आहे.. बघू कधी शिकते पुर्णपणे ..  मनमोकळ्या गप्पा मारणे काय असतं ते कळल !! हिचा ब्लॉग म्हणजे खरोखर एक संवादच असतो.. पहिली ओर्कुट मैत्रिण !!

ओर्कुटमुळे मला काही professional कामं ही मिळाली .. चिंतामणी वर्तक, समीर गाडवे यांचा परिचय झाला आणि तो वाढला पण !! 

mani:
Hi Veerendra, Nice work. Please accept my request. I am an animator too, but more in to business not in to actual making now a days. I respect people how are still doing good work. - Mani
Reply Reply by chat

त्याचबरोबर असे असंख्य अनेक मित्र मिळाले निसटले ज्याना खरतर "मित्र" म्हणू शकत नाही पण त्यानी माझ्याबरोबर टाईमपासही केला आहे we shared good time ..
काही जुने शाळॆतले मित्र ही मिळाले ..त्यातला एक मंदार देशपांडे .. त्याच्याकडे माझा पहिलीतल्या गॅदरिंगचा फोटो होता .. तो मिळाला !! [Happy!] .. धनंजय पाटील, सौरभ जोशी, वेद कुरूलकर, सात्यकी सावरकर आणि बरेच .. [बाकी शाळेतल्या बर्‍याच मैत्रिणी पण सापडल्या .. पण त्या दोन आडनावाच्या झालेल्या होत्या तोवर .. सो त्यानी काही फार ओळख ठेवली नाही .. u know !! :D ]

ओर्कुट मधे दिवसागणिक बदल होत होते तसे अजून मित्र आणि ओळखीचे ही जोडले जात होते.. भाऊ बहिणी अगदी आई बाबानी पण join  केलेलं .. त्यातच ओर्कुट आप्लिकेशन्स आली आणि ओर्टिस्ट समोर आलं .. मला हा प्रकार इतका आवडला की मी त्याचा एक भाग कधी बनलो ते कळ्लंच नाही .. ड्रीम ऎप्लिकेशन्स नावाची एक संस्था काही भारतीय मुलांनी सुरुकेलेली .. माझी ओर्टिंग्स पाहून त्यानी मला सामील केल... पुढे मी ओर्टिस्ट चा लोगो तयार केला .. तो आज ही ते वापरतात.. मला मोठ एक्स्पोजर ओर्कुट मुळॆ मिळालं .. 

visit Ortist

visit Ortist

इतकी मोठी पोस्ट मी खरतर लिहीणार नव्हतो .. पण रहावलंच नाही .. काय सोडू अस वाटल ..तरीही बरचसं सुटून गेलंय ...
[३ वर्ष ओर्कुट्वर असून ही माजे अजून ही १०००० स्क्रॅपस झाले नाहीत .. बघू कोण करतय ते !! :D]
खरतर मी ओर्कुट सोडणार आहे किंवा अजून काही असं कारण नाही पण लिहावंसं वाटल की जरी तू आज जुना किंवा औट डेटेड झाला असलास तरी ..
you gave me a lot back !! Thanks orkut !!

Comments

yog said…
so nostalgic!

Popular posts from this blog

आवडता पक्षी - मोर

ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D


आवडता पक्षी - मोर

मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो ..
सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.