Skip to main content

Posts

Showing posts from May, 2009

लेखनप्रयोग

खरंतर मी ब्लोग सुरू कराव अस काही ही घडलं नाहीय पण तरीही हा प्रयोग प्रपंच. रोजच्या कामात असताना किंवा रिकामं बसलेलं असताना काही विचार मनात येतात, कधी आनंदाचे, निराशेचे, निरागस, लोभस .. शेकडो विचार असतात या मनात .. इथे माझे विचार मी मोकळेपणाने मांडणार आहे.
मला गाणी आवडतात, सिनेमातली किंवा गझल भावगीत सुद्धा.. मला काही English गाणी आवडतात. त्या बद्दल लिहायला आवडेल. खरंच, एखादीच ओळ आपला अख्खा दिवस गोड करु शकेल अशी किमया आहे या गाण्यांमधे ..
मला चित्र काढायला आवडत .. पण मी इथे फक्त मला आवड्णारया चित्रांबद्दल बोलणार आहे .. सिनेमा .. त्यांचे प्रकार .. रोजची चटर पटर आणि असच काही बाही .. खरंतर मी मलाच तपासणार आहे .. त्रयस्थ नजरेतून ! ( कीअस्वस्थनजरेतून ?)