
आज खूपच दिवसानी प्रत्यक्षात युगांनंतर वाटत आहे. पण जलरंगात प्रत्यक्ष जागेवर बसून काम केल. पुणे विद्यापीठातलं जुनं कॅंटीन आहे हे. इथे कायम वर्दळ असते, मुला मुलींचे ग्रूप्स आणि प्रोफेसर लोकांची टोळकी .. [टाळकी] इथे चहा गप्पांसाठी येत असतात .. सतत रिक्षा कार आणि दुचाकी ये जा करत असतात .. आणि रस्ता ओलांडला की एक अत्यंत रम्य आणि निवांत असा बगीचा आहे. फार काहीच तिथे बागकाम केलेले नाहीय. पण तरी ही रम्य आहे ते तिथल्या वृक्षराजी आणि तळ्यामुळे... आणि शांततेमुळॆ
आज खूप दिवसानी तिथे गेलो .. जुने कॉलेजचे दिवस आठवले .. स्केचिंग करता करता गप्पा माराय्च्या .. स्पॉट शोधत तास तास शोधत फिरायचं ..स्पॉट सापडला की आजुबाजुचे काही न पहाता लगेच बसून काम सुरु करायचे .. किंवा पाणे आणण्याच्या निमित्ताने इतरांची विशेषत: वर्गातल्या काही खास व्यक्तिंची चित्रे पहायची आणि त्यात ’मदत’ ’corrections' करून द्यायच्या आणि जरा मैत्री वाढवायची .. :P सग्गळ आठवलं पण आज ते आठवून ही काम करायची ओढ कमी झाली नाही की मी भूत काळात रमलोही नाही.. रमावेसे वाटलेही नाही..
आज मला मनापासून चित्र काढायची ओढ लागली होती.. खूपच .. बसलो .. स्पॉटही सापडला .. नीट वस्तू मांडल्या पाणी ओतून घेतलं ब्रश रंग काढून घेतले.. काम सुरु केल.. कागदावर पाण्याचा एक हात दिला आणि हळू हळू रंग सोडले .. मला रंग हाताळ्ता येतच नव्हते .. काही केल्या. .. रंगाचे अंदाज चुकत होते, कागद मधेच खराब होता, रंगाच्या ट्युब्स वाळ्ल्या होत्या काही. .काही रंगाचा फेसच होत होता, जस सगळ्यानी परिक्षा पहायच ठरवलं होतं, म्हणायला गेल तर ही कारणे सामन्य आहेत काम करत असलेल्या चित्रकारासाठी..खूप दिवसानी काम करणार्या माझ्यासारख्याला कामापासून परावृत्त करायला खूप सारी आहेत. पण तरी ही कुठल्याच कारणाने निराश न होता फक्त चित्र पूर्ण करायच आणि कोणी काही म्हणले तरी चालेल आज आपण स्वत:ला स्वत:पुढे हारू द्यायचे नाही एवढेच ठरवेले होते.. कसे बसे रंगाचे प्राथमिक वॉश मारले पण नंतर लक्षात येऊ लागलं की इतकं पण आपण वाईट करत नाहीये. जरा रंगाच आणि पाण्याच प्रमाण चुकत होत. कागद ही पाणी शोषून घेत होता.. [आधीच उल्हास.. त्यातून कागद bloating ] तरीही मी काम सुरूच ठेवलं
मधून मधून येणारे जाणारे .. आणि इतर ही चित्र काढायला आलेले भेटत होते .. काही जुने मित्रही भेटले. मुळीक सरांचा चित्रणाचा वर्ग ही इथेच होता .. त्यांचे मार्गदर्शनानेही हुरूप आला...
आज मी या चित्राबद्दल लिहिण्यापेक्षा माझ्या मनस्थिती बद्दल लिहिलय .. कारण चित्र करण्यासाठी चांगली मनस्थिती लागतेच ना ! असो .. आता एक पाऊल पुढे टाकलं आहे .. आता थांबायच नाहीय .. पॆंटिंग चालू .. संडे हो या मंडे . :D
Comments
तो झाडांतून दिसणारा आकाशाचा निळसर तुकडा केवळ अमेझिंग जमलाय !
मनापासून आभार !