
"I see you"
आज मी अवतारच नव्हे, अख्ख विश्वरूप दर्शन पहिल! याच थ्रीडी चित्रपटातील हे वाक्य आहे, आणि चित्रपट संपल्यावर तुम्हाला वाटतच की तुम्ही नुसत पहिलच नाही तर तुम्ही काहीतरी अनुभवलं आहे ..तुमच्या सर्व जाणीवा जाग्या करून सोडणे याला काय म्हणतात? असे विचारलं तर तुम्हाला ते जाणवण्यासाठीच का होईना हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे.
माणसाच्या दोन्ही चांगल्या व वाईट भावना इथे सशक्त मांडल्या आहेत .. जेम्स कमेरून या माणसाला जर ३D या पेक्षा जर कुठला अजून भारी मेडिया दिला तरी तो त्याचे सोने करेल यात शंकाच नाही.. सशक्त कथा, मांडणी आणि स्पेशल इफेक्ट्स चा यथायोग्य वापर .. श्शी! फारच formal लिहिण होतंय .. हा चित्रपट तुम्ही फक्त पाहायला नव्हे, अनुभवायला हवा आणि तेही थ्रीडीतच!
इतकच सांगेन .. वरचे दोन डोळे दाखवणारी जी फ्रेम आहे ती चित्रपटाची शेवटची फ्रेम आहे .. आणि त्या आधी जे घडत ते अविस्मरणीय, जबरदस्त, शब्दात न मांडता येण्यासारखे आहे.
don't miss it !
Comments