ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D

आवडता पक्षी - मोर
मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.
मोराला दोन पंख असतात त्याला फार उंच उडता येत नाही पण तो वेगाने उडतो. मोराच्या बायकोला लांडोर म्हणतात. जशी मुलींना फारशी अक्कल नसते तशीच लांडोर ला पिसे नसतात पण ती मोराबरोबर फिरत असते.
आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. काही लोक मोराची शिकार करतात ते मात्र मला आवडत नाही. काही मोर पांढरे असतात कदाचित ते म्हातारे असावेत कारण ते एकटेच दिसतात.
मी मोर पहायला पेशवे बागेत जायचो पण आता तिथे मोर-लांडोराऐवजी प्रेमी युगुले असतात म्हणून बाबा मला तिथे नेत नाहीत. पण आम्ही दर आठवड्याला मोर मधे जातो मला तिथे जायला खूप आवडते कारण तिथे एक गाडी असते त्यात मला बाबा बसू देतात आणि बाबा हमाला सारखे गाडी ओढत असतात. मी जर शांत राहीलो तर मला तिथे एक चॉकलेट देतात. मला मोर खूप आवडते.
मला मोर खूप आवड्तो .. का आवडते ?

Comments