Skip to main content

वेंकटरमणा गोविंदा ..


गेल्या महिन्यात आमच्या कुटुंब कबिल्यासह [ या कबिल्यामधे घरातले आणि मामा मावश्यांची कुटुंबेही होती ! एकूण २५ जण .. ] तिरूपतिला जाऊन आलो. तसा मी तिथ आता पर्यंत ५-६ वेळा जाऊन आलोय.. मस्त जागा आहे. मला तरी तिथलं वातावरण खूप भारी वाटतं ! दिवस भर हुंदडायच आणि भूक लागली की फ्री मिल मधे किंवा स्टॉलवर भातावर ताव मारायचा ! मला खरतर डोंगर चढत जायच होतं पण यावेळेस असं फार काही करता आलं नाही. :( पुढल्यावेळी नक्की करणार आहे . ..

तीन दिवस थांबलो होतो तिरूमला मधे, [ तिरूपती हे गाव पायथ्याशी येतं आणि व्यंकटेश्वराचे देवस्थान आहे डोंगरावर तिरूमला मधे ] तिरूमला हे डोंगरावर आहे त्यामुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न होतं एकदम आल्हाददायक ... आमच्या स्वागताला स्वत: वरूण राजे ही हजर झाले त्यामुळे प्रवासाचा शीण ही गेला.. [ आणि पुढे ही वरूण राजाने लुड्बुड न करता दडी मारल्याने फिरायचा उत्साह ही टिकला ! :P] पहिल्या दिवशी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पहिला शोध घेतला तो चांगल्या हॉटेल्चा .. आणि इतर सोयी पाहून वेळ घालवला.. दुसर्‍या दिवशी ११ वाजताच दर्शन होत. सव्वा तासातच श्री व्यंकटेशाचे दर्शन झाले.. लाडू घेतले. .. :D बर्‍याच ठिकाणी प्रसादावर ताव ही मारला.. मोफत प्रसादाचा अनुभव घेतला [ अनुभवच .. एक वेळेस काही हजार माणसं जेवताना पहाणं आणि त्यातला एक भाग असणं हा एक अनुभवच नाही का ! ] तिसर्‍या दिवशी तिथली आधी पाहिलेलीच पापविनाशनम, आकाशगंगा, वेणूगोपाल मंदीर, विष्णू पद, शीलातोरण अशी ठिकाणे ही पाहिली.
मला तिरूमला वर रहाणं का कुणास ठाऊक अगदी सहज वाटतं .. अनोळखी असं वाटतंच नाही. त्यामुळे एकदम मस्त वाटलं .. बर्‍याच वेळा मी एकटाच फिरून आलो .. खूप फोटो काढले.. ते इथे टाकले आहेत
तिथल्या एक चहावाल्याशी पण आमची मैत्री झालेली.. व्हायचं काय की , सगळे जमले की पत्त्याचा डाव रंगायचा .. गड्ड्या झब्बू .. नाहीतर बदाम सात .. जो गाढव होईल त्याने चहा सगळ्यांना द्यायचा .. त्यामुळे दिवसा रात्री कधीही .. मनात आलं की आम्ही या चहावाल्याकडे जायचो .. आणि फर्माईशी सुरू .. बर ते पाहून इतर चहावाले ही वैतागलेले... शेवटच्या दिवशी आम्ही सांगीतल की उद्या आम्ही नाहीय . तेव्हा त्याचा चेहरा पडला ... त्याचे काही व्हिडीओज इथे टाकले आहेत एकूण ट्रीप मधे धमाल मजा आली
काही गोष्टी मात्र खटकल्या त्या म्हणजे सर्व मंदीरांच व्यवसायिकरण झालं आहे . तिकीटाने दर्शन होतं .. खूप बाजार मांडला आहे याचा भाव मनात दाटून येतो. पण ते कुठे नसत ? .. सगळीकडे तेच आहे. .. असो .. चांगली गोष्ट अशी की किती ही झालं तरी सोयी ही तितक्याच आहेत . .. रस्ते फूटपाथ स्वच्छ आहेत .. खूप कमी, [ खरंतर नगण्य ] भिकारी दिसतात .. धर्मशाळेत खूप चांगल्या स्वच्छ रूम आहेत .. गरम गार पाण्याची २४ सोय सर्वत्र आहे .. अश्या अनेक सोयी मोफत वा खूप कमी खर्चात मिळतात.. :)


तिरूमला पाहिल्यावर आम्ही तिरूपति मधे खाली उतरलो .. आणि तिथे पद्मावति, गोविंदराज मंदिरांमधून दर्शने घेतली .. मग रेलवे स्थानकावर आलो आणि हरिप्रिया एक्स्प्रेस ने कोल्हापूर गाठले .. दोन दिवस तिथे थांबलो .. दुसर्‍या दिवशी देवीला अभिषेक केला .. प्रसाद घेऊन पुण्याला पोहोचलो...

तुम्ही कधी गेलाय तिरूपतिला ? काय नवीन पाहिल ते जरूर सांगा !

Comments

Popular posts from this blog

आवडता पक्षी - मोर

ओर्कुट वर मी एक कम्युनिटी सुरु केली "लहानपणीचे महान उद्योग " या नावाने. त्यात एकाने विषय टाकला होता की आता मराठीत निबंध लिहा. तेव्हा लहान असताना जसा लिहायचात तसा आठवून लिहा. किंवा त्या पद्धतीचा .. मी हा लिहीला आहे .. :D


आवडता पक्षी - मोर

मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मोराचा रंग निळा अस्त्तो. पण त्याला निळू म्हणत नाहीत मोरच म्हणतात. मला निळू फुले यांचे सिनेमे आवडतात. नाच रे मोरा हे गाणे देव बाप्पा सिनेमातले आहे. गणपति बाप्पा चे वाहन जरी उन्दीर असले तरी तो कधी तरी एक्दा मोरावर बसला होता म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. मयुर माझा मित्र आहे पण मी त्याच्याशी जास्त भांडतो कारण तो नेहमी माझ्या पेक्षा जास्त मोराची पिसे त्याच्याकडे आहेत म्हणून मला चिडवत असतो.

Thank you Orkut !!

ओर्कुट ...
Profile views: Since Feb '06: 20,586, Last week: 12, Yesterday: 1

२००६ साली मी अरेना मधे शिकत होतो (?) .. प्रश्नचिन्हाकडे टक लावून पाहू नका .. ते ते का आहे ते परत कधी तरी सांगीन.. अनुजा नावाच्या एका बोलघेवड्या मैत्रिणीने मला या ओर्कुट नावाच्या कम्युनिटीवर जवळ जवळ खेचूनच आणलं .. तिच आपलं सारखं चालायच .. ही कम्युनिटी आहे तो ग्रुप आहे.. असं आणि तसं .. शेवटी आलोच .. कोणीच मित्र नव्हते .. काय आहे ते ही कळत नव्हत .. पण तरी ठीक वाटलं .. तेव्हा मी एक्दाच फ़ेसबूक वर जाऊन आलो होतो आणी माय्स्पेस पण वापरल होतं तसंच काही असेल असं वाटलं होतं .. पण हे भलतंच होतं ..
परवा सहजंच चाळता चाळता अगदी पहिल्या स्क्रॆप पासून चाळायला सुरुवात केली आणि अनेक टाईमपास .. सिरीयस आठवणी जाग्या झाल्या .. काही स्क्रॅप देत आहे ..
हा पहिला वहिला ..

Anuja:
Hi avadale na! bagh mi sangat hote na join ho mhanun. any ways aata tuzya avadichya ani itar communities bagh. specially Sandeep Khare & Saleel Kulkarni By

सैर सपाटा

आज ऑफिस मध्ये बसून काम करायचा मूड नव्हता .. काही केल्या लक्ष कामात लागत नव्हत .. बहिणीला सोडायला म्हणून मोदी गणपतीच्या जवळ जायचं होतच .. तसाच पुढे गेलो आणि बालगंधर्व च्या आवारात गाडी लावली .. आणि चालत चालत निघालो ..
सगळा माहोल गजबजून गेलेला .. संध्याकाळ चे साडेसात वाजत आले होते .. त्यामुळे एर्व्हीचा जंगली महाराज रस्ता  आता झगमगत्या रंगात न्हाउन निघाला होता, दोन्ही बाजूला या रस्त्याचे वैभव असलेली शिरीषाची झाडं स्वत:च्या काळ्याभोर फांद्यांनी अधिकच गहिरेपण आणत होती.