
दुपारची टळटळीत उन्हाची १२ची वेळ.. मी आईला घेऊन घरी येत होतो. सिग्नल पडला आणि मी भर चौकात थांबलो. घामानं निथळलो होतो आणि आणि वैतागलो पण होतो .. आणि एव्ढ्यात एक व्हॆन शेजारी येउन उभी राहिली. गाडीत शाळेतली छोटी छोट्टी चुन्नू मुन्नू होती आणि चक्क लहानमुलांची गाणीच ऐकत होती .. " झुक झुक झुक अगीन गाडी .. धुरांच्या रेषा हवेत काढी .. "
मी १० वर्ष मागे गेलो आणि क्षणार्धात परतलोही .. सिग्नल सुटला मीही निघालो.. पण विचार सुटेना ..विचार मनात चालूच होता. आज मुलं मामाच्या गावाला कुठे जातील .. समोरच्या बिल्डींगमधे किंवा दुस-या उपनगरात .. मामाच त्या शहरातला असेल तर पोरं जाणार तरी कुठे .. त्याना ते सुखच नाही .. जे मी आणि माझ्या भावंडांनी मिळवलं
आणि मामा असलाच दुस-या गावी तर तो एकदम असतो दुस-या देशात.. मग मुलं काय म्हणतील .. काय करतील .. याच भावनेतून मी ही विडंबन कविता केली आहे .. पहा जमलीय का ते ?
सूं.. सूं .. सूं सूं विमान जाई
उंच ढगात झोके घेई
देशांची नावे सांगू या
मामाच्या देशाला जाउया
जाउ या
मामाच्या देशाला जाउया
मामा माझा नोकरदार
कंपनीच घर न दार
उंच इमारती मोजु या
मामाच्या देशाला जाउया
मामाची बायको गोरटी
म्हणेल काळी ही पोरटी .. हां ... ? हां
तिला मराठी शिकवूया ..
मामाच्या देशाला जाउया
मामाची बायको ख्रिश्चन..
तिच्या घरात नाही किचन
मग फास्ट्फूड रोज खाउ या ..
मामाच्या देशाला जाउया
काय मामाच्य देशाची पुर्वाई
पण , मन रमत नाही .. आई..
घरीच लवकर जाऊ या..
मामाच्या देशाला जाउया
सूं.. सूं .. सूं सूं विमान जाई
उंच ढगात झोके घेई
देशांची नावे सांगू या
मामाच्या देशाला जाउया
जाउ या
मामाच्या देशाला जाउया
--------------
Comments