Skip to main content

Posts

Showing posts from June, 2009

वेंकटरमणा गोविंदा ..

गेल्या महिन्यात आमच्या कुटुंब कबिल्यासह [ या कबिल्यामधे घरातले आणि मामा मावश्यांची कुटुंबेही होती ! एकूण २५ जण .. ] तिरूपतिला जाऊन आलो. तसा मी तिथ आता पर्यंत ५-६ वेळा जाऊन आलोय.. मस्त जागा आहे. मला तरी तिथलं वातावरण खूप भारी वाटतं ! दिवस भर हुंदडायच आणि भूक लागली की फ्री मिल मधे किंवा स्टॉलवर भातावर ताव मारायचा ! मला खरतर डोंगर चढत जायच होतं पण यावेळेस असं फार काही करता आलं नाही. :( पुढल्यावेळी नक्की करणार आहे . .. तीन दिवस थांबलो होतो तिरूमला मधे, [ तिरूपती हे गाव पायथ्याशी येतं आणि व्यंकटेश्वराचे देवस्थान आहे डोंगरावर तिरूमला मधे ] तिरूमला हे डोंगरावर आहे त्यामुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न होतं एकदम आल्हाददायक ... आमच्या स्वागताला स्वत: वरूण राजे ही हजर झाले त्यामुळे प्रवासाचा शीण ही गेला.. [ आणि पुढे ही वरूण राजाने लुड्बुड न करता दडी मारल्याने फिरायचा उत्साह ही टिकला ! :P] पहिल्या दिवशी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर पहिला शोध घेतला तो चांगल्या हॉटेल्चा .. आणि इतर सोयी पाहून वेळ घालवला.. दुसर्‍या दिवशी ११ वाजताच दर्शन होत. सव्वा तासातच श्री व्यंकटेशाचे दर्शन झाले.. लाडू घेतले. .. :D ब