Skip to main content

Posts

Showing posts from January, 2008

कॅलिडोस्कोप

विविध रंगांचं.. आकारांचं.. विविध प्रतलांचं .. एक देखणं विश्व.. प्रकाशाच्या सानिध्यात साधे काचेचे तुकडे ही इतकी सुंदर निर्मिती करु शकतात याचं मूर्तीमंत उदाहरण. मला कॅलिडोस्कोपचं लहानपणापासून आकर्षण आहे. मी काही स्वत: जाऊन विकत घेतले आहेत वगैरे असं काही नाही. आमच्या वाड्यात एक घर होत. [ मी लहानपणापासूनच वाड्यात सर्व घरांमधे अप्रतिर्हत संचार करू शकत होतो. कारण मी एक तर सगळ्यात लहान आणि इतर माणसांचा (भाडेकरूंचा - हा शब्द मला तसा इथे चुकीचा वाटतो.) आवडता होतो. त्यामुळे मी कुठे ही असायचो. हां तर कुठे होतो मी ? हां कॅलिडोस्कोप.. तर आमच्या घरामागे त्याचं घर होतं त्यात एक चौकोनी कुटुंब रहायचं .. त्यातले काका शाळॆमधे गणित शिकवायचे आणि त्यांची दोन हुशार मुले व काकु. असं छान कुटुंब. तर ते काका मला अशा गमतीशीर गोष्टी दाखवायचे.. त्यानी मला एके दिवशी कॅलिडोस्कोप करून दिलेला. ]खरंतर खूप जुनी आठवण आहे ही.. मग त्याचा इथे काय संबंध.. आहे. आज आम्ही मित्र मित्र एकाच व्यक्तीबद्दल बोलत होतो. पण प्रत्येकाच मत वेगळं. खूप चर्चा आणि वाद. मग तो हेच करत नाही .. तेच करतो.. तो शिस्तीत शेंडी लावतो, आ